आपण ज्या समाजात राहतो त्यात होणाऱ्या चुका किंवा चुकीच्या गोष्टी आपल्याला नेहमीच खटकत असतात. आपल्याला वाटतं की हे बंद व्हावं. पण बोललो तर एकटे पडू ह्या भितीने आपण दबून बसतो.

पण ती गोष्ट बोचत असतेच ना आपल्याला. मग आपण जिथे कमी त्रास होईल/ कुणी समजून घेईल अशा ठिकाणी बोलण्याची सुरुवात करतो. समोरची व्यक्ती आपलं म्हणणं ऐकून घेईल असं आपल्याला वाटतं.

मग आपण आपला मुद्दा, काय खटकतंय आणि कसं थांबलं पाहिजे हे सांगतो. समोरची व्यक्ती हो ला हो लावत असतेच आणि शेवटी येतं ते वाक्य जे आपल्याला अनपेक्षित असतं.

“पण मी काय म्हणतो आभ्या, आजपर्यंत नाही का झालं असं काही? बाकीच्यांनी केलं तेव्हा का नाहीस बोलला? सरळ सरळ सांग ना आमचंच खुपलं डोळ्यात. आजपर्यंत ऐकून घेतलं ‘तुमचं’ आज आम्ही उभा राहतोय तर दुखलं व्हय?”

अरे काय? कुठे? का दुखेल? नेहमी असली काळिबेरी कारणं असायलाच पाहिजे का एखाद्या प्रश्नामागे? घेतलाच पाहिजे का doubt? त्याला जातीयवादी रंग दिला जातो आणि चांगली मैत्री “कोण तू?” ने ****

(मिरवणुकीतील, गणपतीत, नवरात्र, आंबेडकर जयंतीच्या वेळच्या चुकीच्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी मराठा मूक मोर्च्यादरम्यान होणाऱ्या चर्चांचं निमित्त झालं बास!)

Advertisements