घरून निघातांना वेळेत बॅग पॅक केली जाते. मित्रांना हवा तेवढा वेळ दिला जातो, आपण घरच्यांनाही छान बोलून निरोप घेतो. बस स्टँड वर सोडायला एक सोडून दोन गाड्या येतात मग तुम्ही आलटून पालटून दोन्ही गाड्यांवर बसता. घ्यायला येणारा दोस्त पण खास तुमच्यासाठी लवकर झोपणार असतो.

मधेच हुक्की येते सोडायला आलेल्या मित्रांसोबत एक चहा घ्यावा (उगाच शेवटचा चहा असल्याचं फिलिंग). 😉

बस स्टँड वर पोहोचल्याक्षणी समोर अपेक्षेपेक्षा जास्त स्वच्छ लाल डब्बा, त्यात पुरेशी जागा. सगळं कसं एकदम परफेक्ट….

पण नाही, आपला आपल्या नशिबावर खास असतो ना तो भरोसा सांगत असतो ‘बेटाजी, ये कुछ सही नहीं हो रहा’

तेवढ्यात 7 तासांचा प्रवास सुरु होऊन तासभर झालेला असतांना कंडक्टर म्हणतो ‘समोरचं टायर बसलंय’

आणि नशिब आपल्याकडे बघून आसुरी हास्य करत म्हणतं, “कवाचं हेच तर सांगून ऱ्हायलो होतो ना बाप्पा!”

(टीप : सध्या मी सुखरूप रूम वर पोहोचलो आहे. 😀 )

Advertisements