काल मित्राला बस स्टॅंड वर सोडायला जात होतो. बांगलादेश VS भारत मॅच ची शेवटची ओवर सुरु होती. शेवटची विकेट आम्ही गाडीवर च सेलिब्रेट केली.

जिंकलो!!  हुर्रे!!

मित्राला सोडला, वापसी ला लागलो.

रस्त्याने (FC road) येतांना एक गाडी भुर्रकन बाजूने गेली. कपाळावरच्या आठ्या गाडीवरचा तिरंगा बघून लगेच गायब झाल्या. आणि ३०-४० च्या स्पीड ने जाणारी माझी गाडी त्या तिरंग्याच्या जवळ जायला लागली. स्पीड कधी ६०-७० झाली कळाल सुद्धा नाही.

 

trio

 

“भारत माताकी जय!”, “वंदे मातरम्”, “जय हिंद” च्या घोषणा. वाटेत जो कुणी दिसेल तो आपला भाऊ ‘बांधव’ असल्यासारखा हात दाखवत होता. हळू हळू २-३ गाड्यांचा ग्रुप २0-२२ पर्यंत गेला.

कुणी ‘मित्राला सोडवून परततांना’, कुणी कामावरून वापस जातांना, कुणी मुद्दाम फिरतांना अश्या हौश्या लोकांनी रस्ता भरला होता. डेक्कन ला आल्यावर मात्र हळू हळू “आमचा ताफा” बिखरला. आपापल्या घराकडे वळू लागला. आणि परत माझी गाडी ३०-४० च्या स्पीड ने रूम पर्यंत आली.

 

१० मिनिट पण मी त्या वातावरणात नसेन, पण अगदी भरून गेलो होतो.

त्या ताफ्यातल्या प्रत्येकाला असाच वाटलं असेल का?

-होय

तिरंग्याची जादू म्हणजे हीच का?

-होय

शेवटी गर्दी कशी तरी होते ह्याच उत्तर एकदम सोप्पंय..

मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर, लोग साथ आते गये कारवां बनता गया

– मजरुह सुलतानपुरी

Advertisements