खूप लोक लिहितील ह्यावर.

खूप लोक शिव्या पण देतील ह्या प्रकाराला.

पण बदल कुठे घडून येतोय का?

आजही कागदी आणि प्लास्टिक चे झेंडे, रिबीन्स, ब्याजेस, बिल्ले भरभरून विकले जातात.

आजही भरधाव गाड्यांच्या ह्यांडल ला अडकवला जातो माझा तिरंगा.

का?

देशप्रेम इतकं स्वस्त, सहज, आणि किफायती झालय?

मी आजच्या दिवशी अशी खूप बडबड करत असतो.

मग, आज मी झेंडावंदन आणि परेड बघायला पोलीस कवायत ग्राउंड वर गेलो होतो.

तिथे मला दिसले पोट सुटलेले पण तरीही जीवानिशी परेड मध्ये काही कमी पडू नये म्हणून झटणारे पोलीस.

तिथेच मला दिसले लहान पावलांनी आपापल्या जोरानुसार परेड करणारे सैनिकी शाळेचे विद्यार्थी.

आणि तिथेच मला दिसले माझ्याच वयाचे, पोलीस ट्रेनिंग सेंटर च्या भावी पोलिसांचे दिमाखदार संचालन.

तिथेच मला दिसला हा बापड्या ज्याला तिरंग्याचा पापा घेण्याचा मोह आवरत नव्हता.

मी तर दर झेंडावंदन ला इथे येणारे. सकारात्मक बदल घडवण्याची जादू आहे इथे. मी ह्या वातावरणाने भार्लोय पूर्णपणे तुम्ही ही अनुभव घ्या..

जय हिंद!

टीप : तिरंगा आहे तिथेच आहे. तो पडल्याने त्याचा अपमान होणार नाहीये, पण पायदळी येऊ देऊ नका आणि आलाच तर त्याचं काय करायचं ह्याचं भान ठेवा.

tricolor

Advertisements