सकाळी काही कामानिमित्त Office of the Economic Adviser ची web-site उघडली. मला त्यातुन wholesale price index संबंधी माहिती काढायची होती. काम करता करता एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे तिथे ‘price’ च्या ऐवजी चुकून ‘peice’ असं होतं.

मला थोडसं आश्चर्य वाटलं आणि नाराज ही झालो, भारत सरकार ची वेब साईट आणि त्यात spelling mistake??(ती सुद्धा अनावधानानेच झालेली असणारे, मान्य.)

सुधारणा हवी!!

पण आपण काय करणार? आपण एक सामान्य नागरिक(प्रत्येकाचा न्यूनगंड) आपण काय बाबा सांगू एकदा, पण आपलं कोण ऐकेल?? कोणी लक्ष घालेल? कारण गोष्ट फार छोटीशी होती नं!

सहकर्मीयांशी ह्याबद्दल बोललो, त्यांच्या प्रतिक्रिया काहीही विशेष नव्हत्या. ‘काय आता सरकारी काम’ आणि एकच हशा. पण ह्यावेळी मला हसु येत नव्हतं.

मला ते पटलं नाही, “आपलं सरकार..” असं बऱ्याचदा ऐकल्यामुळे असेल कदाचित! tongue emoticon मला ‘मी ते बदलू शकेन.’ ह्यावर थोडिशी शंका होती. पण मी जर प्रयत्नच नाही केला आणि नंतर मीही असाच हसणाऱ्यात सहभागी झालो आणि सरकारी यंत्रणेला दोषी, अकार्यक्षम मानु लागलो तर?? काय बदलेल? नकारात्मकता वाढेल फक्त. ठरलं तर मग. एक प्रयत्न व्ह्यायला हवा.

पण तरीही मला हवा तो momentum मिळाला नव्हता. मला माहित होतं काय करायच किंवा कराव लागणार ते पण “तू भिड!!” म्हणनारा हवा होता. ओमकार दादा शी बोललो.

बस मग. मी पटकन contact us मधे mail-id शोधले, पहिला होता तो Aditi S. Roy (Principal Advisor at Office of Economic Advisor) मॅडम चा. बाकिच्यांचे सुद्धा बघितले पण पहिला वाला वजनदार होता. (Highly important person) माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजीमधे मसूदा type केला.

हा आटापिटा करतांना माझा सहकर्मचारी माझी उडवत होता हो. अगदीच धाकधुक करत मी mail पाठवला.

आणि खुशखबर!!

दोन दिवसांत धर्मेंद्र कुमार (Assistant Director at Office of Economic Advisor) ह्यांचा mail आला. त्यांनी सुधारणा केल्याचा आणि ती कळवल्याबद्दल धन्यवादाचा.

EAOC

अपना दिल खुश! मी तो mail सहकर्मचाऱ्याला दाखवला. उडालाच तो बेट्या!! आता मला त्याची मजा घ्यायची आयती संधी चालून आली होती. पण मला तेवढ्यात कुणी मोठ्या माणसाने सांगितलेल्या वाक्याची आठवण झाली. मी समजावणीच्या स्वरात बोललो,

” काही गोष्टी करायला सोप्या असतात. त्यांचा सकारात्मक परिणामसुद्धा लगेच मिळतो. पण आपण केवळ आळस, न्यूनगंड किंवा हलगर्जीपणामुळे फर्स्ट action घेत नाही. जर आपण अश्या छोट्या छोट्या सुधारणा करण्यात हातभार लावायला लागलो तर गोष्टी error free व्हायला वेळ लागणार नाही…”

सोबत वेब साईट ची लिंक.

–एक सुधारणावादी नागरिक

Advertisements